बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन
मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा आयोजित कै. भाऊ गुराम पुण्यतिथी निमित्तपुस्तकाने मला काय दिले? या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन व साने गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तकेवाचनासाठी दिली होती. त्या पुस्तकात मला काय गवसले ? हे मुलानी २०० शब्दात लिहून स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत मोठ्या गटात स्वरा अर्जून पेंडूरकर – खरारे हिने प्रथम क्रमांक व लहान गटात पलक पराग महाभोज – गुरामवाडी हिने प्रथम क्रमांक पटकावला मोठा गट द्वितीय क्रमांक : साई राज शंभू परुळेकर – वराड, मधूर अर्जून पेंडूरकर – खरारे, तृतीय क्रमांक : त्रिशा देवदास रेवडेकर – कट्टा, उत्तेजनार्थ : यशिका देवू पालव – वराड, जान्हवी संतोष नांदो सकर – नांदोस, गिरीजा राजेंद्र नाईक – कुणकवळे. लहान गट द्वितीय : सोहम सूर्यकांत गावडे – कट्टा, तृतीय : काव्य विनोद दळवी – ओरोस, वैष्णवी संदीप गोळवणकर – गोळवण. उतेजनार्थ : प्रणित सूर्यकांत शिंदे – वराड, वृषभ दतात्रय टेमकर – वराड, गायत्री गणेश साळुंके – पेंडूर, राशी सत्यवान चव्हाण – चौके, धनश्री आनंद बाक्रे – वराड, ईश्वरी उत्तम पाताडे – कट्टा, वेदिका प्रमोद तेंडोलकर – कट्टा, पायल फुलाराम देवासी – कट्टा.
या स्पर्धेतील विजेते व सर्व सहभागी विद्यार्थी याना२७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता कै. भाऊ गुराम यांचे स्मृतिदिनी देवयानी गावडे मुख्या वराडकर हायस्कूल कट्टा व प्रिया मयेकर मुख्या वराड हायस्कूल यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजक दिलीप रामचंद्र गुरामबापू तळावडेकर, वैष्णवी लाड, शाम पावसकर यानी सेवांगणच्या वतीने केले आहे.
मोठा गट प्रथम : स्वरा अर्जून पेंडूरकर – खरारे
लहान गट प्रथम : पलक पराग महाभोज – गुरामवाडी