मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या 15 वा वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या “श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य प्राजक्ता चिरमुले, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाताडे, देव रवळनाथ कमिटी गोळवणचे अध्यक्ष मनोहर परब, उपाध्यक्ष प्रल्हाद नाईक, सचिव नारायण परब, सदस्य अरुण घाडी, नंदादीप नाईक, मुरारी गावडे, तसेच गावातील ग्रामस्थ सुहास घाडी, अमित घाडी, मधुसुधन घाडी, संजय मांजरेकर, योगेश चव्हाण, समीर मांजरेकर, संतोष चव्हाण, . प्रकाश चिरमुले, सुभाष गोळवणकर, बाळकृष्ण गोळवणकर, आत्माराम गावडे, अजित गोळवणकर, सुरेखा नंदादीप नाईक, मेघना विलास नाईक, इंजिनिअर संदेश पवार, यश पाताडे, ग्रा. पं. कर्मचारी रामकृष्ण नाईक, करुणा राणे, बाळाराम परब, कोमल मांजरेकर आदी उपस्थित होते.