विजेच्या बल्ब मध्ये साकारले छत्रपती शिवरायांचे चित्र

कलाशिक्षक समीर चांदरकर यांची आणखी एक अफलातून कलाकृती

चौके (प्रतिनिधी) : शिवजयंतीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्ब मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले. साडेतीनशे वर्षाच्या पारतंत्र्याच्या अंध:कारात खितपत पडलेल्या रयतेला गुलामगिरीच्या चोखडातून मुक्त करत स्वातंत्र्याची पहाट दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आजही सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत. विजेचा बल्ब जसा प्रकाश देतो तसेच शिवरायांचे कार्य, विचार आजही आपल्याला प्रकाशमान करतात. याच धर्तीवर कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी बलच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी त्यांनी बलच्या वरून छेद केला. सरळ ब्रशने रंगकाम करणे शक्य नसल्यामुळे ब्रशला काटकोनात वळवून ऍक्रेलिक रंगांच्या सहाय्याने ही प्रतिमा साकारली. यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागला. अशी नाविन्यपूर्ण साकारलेली महाराजांची महाराष्ट्रातील पहिलीच कलाकृती आहे.त्यांच्या या नावीन्यपूर्ण कलाकृतीसाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होते आहे.

error: Content is protected !!