स्वप्नपूर्ती ग्रामसंघाच्या वतीने आंबडोस येथे 22 मार्चला हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : शनिवार दिनांक 22 मार्च रोजी आंबडोस येथे स्वप्नपूर्ती ग्रामसंघ अंतर्गत प्रणाली चव्हाण यांच्या निवासस्थानी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 10 वाजल्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ, त्यानंतर हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना बक्षीस वितरण आणि सायंकाळी 7 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा अध्यात्मिक ” संत गोमाई ” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी स्वप्नपूर्ती ग्रामसंघातील सर्व बचत गटातील महिलांनी व नाट्यरसिकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वप्नपूर्ती ग्रामसंघाच्या अध्यक्ष व पदाधिकारी महिला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!