“मी लाभार्थी सारथी योजना एक सुवर्णसंधी” – सरपंच शेखर पेणकर

चौके (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे सारथीच्यावतीने युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत संगणकीय प्रशिक्षण दिले जात असून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी MKCL चे कट्टा येथील अधिकृत केंद्र स्मिता कम्प्युटर एज्युकेशनच्यावतीने मी लाभार्थी सारथी या संगणकीय डिप्लोमा कोर्स दशक्रोशितील विद्यार्थ्यांच्यासाठी सुवर्ण संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच शेखर पेणकर साहेब यांनी केले.

या वेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका श्रद्धा सुनील नाईक यांनी सारथी डिप्लोमा कोर्स या विषय माहिती देताना कोर्स साठी लागणार कालावधी व कोर्स साठी लागणारी कागद पत्रे व विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक फायदा या विषयी ग्राम सभेला उपस्थित परिसरातील समाजातील ग्रामस्थ, पालक व सर्व जागरूक नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच या संधीचा आपण आपल्या परिसरातील युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण ही युवकांना प्रवृत्त करावे तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.

error: Content is protected !!