चौके येथील राणे, गावडे कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सांत्वन

चौके (प्रतिनिधी) : चौके स्थळकरवाडी येथील किराणा व्यापारी तसेच आदर्श व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार यांचे मंगळवारी सकाळी दुचाकी अपघातात झालेले दुर्दैवी निधन आणि चौके कुळकरवाडी येथील तीन वर्षाच्या शौनक किरण गावडे या बालकाचा अल्पशा आजाराने झालेला मृत्यू या घटना समजतात मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार निलेश राणे यांनी चौके येथील नंदकुमार राणे, दिगंबर गावडे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सात्वन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजन गावडे, सचिन आंबेरकर, सुरेश चौकेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!