ऑलंपियाड परीक्षेत शांतिनिकेतनचे चमकदार यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारी ऑलिंपियाड फाऊंडेशन तर्फे होणाऱ्या सायन्स व मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल, सावंतवाडी प्रशालेने चमकदार यश संपादन केले. प्रशालेतील कु.रौनक कृष्णा नाईक (इ.३री) याने सुवर्ण पदक पटकावत विभाग स्तरावर ५ वा क्रमांक प्राप्त केला. तसेच मोक्षद परब, हर्ष सावंत, प्रणित मेस्त्री (इ. ३ री), किंजल होडावडेकर ( इ. २ री ). यशराज सामंत. समृद्धी देसाई, गिता मेहता, सुमेधा गावडे, संकेत राणे (इ.५ वी), स्वरदा पराडकर ( इ. ६ वी) व सुरज सावंत (इ.७ वी), या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत सुवर्णपदके पटकावली.
प्रशालेच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. विकास सावंत, कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष नारायण देवरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब नंदिहळ्ळी, विशेष कार्यकारी अधिकारी मनोहर वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक समिर परब, पर्यवेक्षक अनिल सावळे तसेच अन्य संस्था पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच या परीक्षेसाठी अथक मेहनत घेणाऱ्या प्रशालेच्या शिक्षिका सौ. श्रुती मराठे व सौ. अरुणा नाईक – पोपकर यांचे या स्पर्धा परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!