वैभववाडी तालुक्यात चुरशीने मतदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिये दरम्यान कोणत्याही केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या नाही. या निवडणुकी करिता मतदारांमध्ये मतदानासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मुंबई येथून आलेल्या मतदारांमुळे रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची गर्दी झाली होती.

तालुक्यात एकूण 58 मतदान केंद्रे आहेत या 58 मतदान केंद्रांची करिता 348 कर्मचारी कार्यरत होते शिवाय झोनल अधिकारी सेक्टर अधिकारी व अन्य असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रक्रिया संपेपर्यंत तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या विधानसभा निवडणुकीकरिता भाजपा महायुतीकडून आमदार नितेश राणे तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर व अन्य चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र आमदार नितेश राणे व संदेश पारकर यांच्यात खरी लढत होती. मतदारांनी या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त केले आहे.

गावच्या मतदार यादीत नाव असलेले मात्र नोकरी व्यवसाय निमित्त मुंबई पुणे येथे असलेल्या चाकरमान्यांनी या निवडणुकी करता गावात हजेरी लावली. या चाकरमान्यांनीही आपापल्या गावांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. चाकरमान्यांच्या येण्याने रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले होते. या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी उघडले जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!