भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या कणकवलीतील निवासस्थानी 19 जानेवारी रोजी शाही हळदीकुंकू समारंभाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश यांचा राजेशाही डामडौलात नेत्रदीपक असा विवाहसोहळा आणि स्वागत समारंभ नोव्हेंबर महिन्यात संपन्न झाला. त्यानंतर नववर्षातील मकरसंक्रांती च्या पहिल्या सणानिमित्त कणकवली वासीयांशी असलेल्या तेली कुटुंबियांच्या ऋणानुबंधांचा गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या पत्नी साधना आणि प्रथमेश राजन तेली यांची पत्नी सिया यांनी खास शाही हळदीकुंकू समारंभाचे आयोजन 19 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजल्यानंतर आपल्या कणकवली येथील रेल्वे स्टेशन रोडवरील निवासस्थानी आयोजित केले आहे. गतवर्षी 21 नोव्हेंबर रोजी सप्ततारांकित डामडौलात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा चिरंजीव प्रथमेश आणि सिया यांचा
विवाहसोहळा संपन्न झाला.त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात सावंतवाडी जिमखाना मैदानावर प्रथमेश आणि सिया यांच्या विवाहनिमित्त स्वागत सोहळाही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या राजेशाही लग्नानंतर आता कणकवलीवासीयांशी आपल्या असलेल्या ऋणानुबंधांचा गोडवा आणखी घट्ट करण्यासाठी तेली कुटुंबियांच्या वतीने शाही हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.कणकवली शहरासह तेली कुटुंबीय प्रेमींनी या हळदीकुंकू समारंभाला उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण साधना राजन तेली आणि सिया प्रथमेश तेली यांनी दिले आहे.