कायदा सुव्यवस्था सामाजिक शांतता राखण्यात पोलीस पाटीलांचे महत्वाची भूमिका – पीआय अवसरमोल

वैभववाडी (प्रतिनिधी) : गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक शांतता, सुरक्षा,व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्वाच्या भूमिका बजावत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकित तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारचे काम केले आहे.आजच्या पोलीस पाटील दिनानिमित्त भविष्यात ही आपल्याकडून अशाच कामाची अपेक्षा आहे असे प्रतिपादन वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ शाखा वैभववाडी यांचे वतीने १७ डिसेंबर पोलीस पाटील दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सुनील अवसरमोल बोलत होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल वैभववाडी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एस. एम.सुतार,पोलीस कॉन्स्टेबल संदीप कांबळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठवर,पोलीस पाटील संघाचे तालुकाअध्यक्ष राजेंद्र रावराणे,राज्य कार्यकारणी सदस्य औदुंबर तळेकर,प्रदीप पाटील,पांडुरंग कोर्लेकर, समिधा सावंत, पोलीस कॉनस्टेबल जितेंद्र तळेकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन सचिव सुनील कांबळे तर आभार औदुंबर तळेकर यांनी मानले.  यावेळी वैभववाडी तालुक्यातील बहुसंख्येने पोलिस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!