नितेश राणेंकडे मत्सोद्योग, बंदर खात्याची जबाबदारी ! अखेर खातेवाटप जाहीर

पहा मंत्रीनिहाय खातेवाटप

कणकवली (प्रतिनिधी) : अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे.

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

पंकज भोयर – गृहनिर्माण,

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांना खाते वाटप होईल अशी अपेक्षा होती. मात्र अखेर आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे.

error: Content is protected !!