नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे स्वागत
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर खारेपाटण येथे जिल्हा भाजपाच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले, चक्क ५१ जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मंत्री नितेश राणे यांचे नवीन कुर्ली ग्रामस्थांच्यावतीने खारेपाटण येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र कोलते, अमित दळवी, अतुल डऊर,धिरज हुंबे, बाळकृष्ण चव्हाण, अनंत चव्हाण, विजय आग्रे, सचिन साळसकर, प्रकाश दळवी, शिवाजी चव्हाण, गजानन पवार, मंगेश मडवी, अनिल दळवी, भाग्येश पवार, अक्षय कोलते आदि भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.