उद्या मतमोजणी : भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे सेना आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद
देवगड (प्रतिनिधी) : अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे कांग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅन यांच्यात चुरस निर्माण झाली असून दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत या बँकेचे एकूण ११५४३ सभासद मतदारांपैकी ३३४७ मतदारांनी मतदानादाचा हक्क बजाविला व एकूण मतदान २८. ९९% टक्के मतदान झाले रविवारी सकाळ पासून दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते व उमेदवार गटागटाने देवगड व तालुक्यातील अन्य मतदान केंद्रावर गटागटाने बुथवर एकत्रित येऊन मतदारांना केंद्र व नंबर काढून देत होते. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व राष्ट्रीय कॉंग्रेस चे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या मतदानाचा हक्क बजावून अन्य मतदारांशी संपर्क साधून मतदानाकरिता प्रोत्साहन देत होते शिवम पॅनेलचे नेते माजी आमदार अजित गोगटे यांनी शिवम पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार एकतर्फी विजयी होतील असा आत्मविश्वास व्यक्त करीत होते.
तर सहकार समृद्धी पॅनेलचे नेते संतोष तारी, उल्हास मणचेकर, गणेश गावकर यांनी मतदान कमी झाल्याचा फायदा सहकार समृद्धी पॅनेलला होणार आहे. मतदारांची विद्यमान संचालक मंडळावरील नाराजी या मतदानातून दिसून येणार आहे असेही ते म्हणाले.
देवगड मधील ५ मतदान केंद्रावर ५८०४ मतदारांपैकी १८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर नारिये मतदान केंद्रावर १६३८ पैकी ७०२ मतदारांनी मतदान केले पडेल मतदान केंद्रावर २२६९ मतदारांपैकी ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला तर तालुक्या बाहेरील कासार्डे मतदान केंद्रावर ८८७ पैकी १३ मतदारांनी मतदान केले. कुडाळ मतदानकेंद्रावर ९२० पैकी १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
गेली.८५ वर्षे देवगडच्या सहकारात कार्य करीत असलेली व्यापारी, मच्छीमार, शेतकरी यांची ही बँक देवगड प्रधान कार्यालयाबरोबर, कुणकेश्वर, पडेल, नारिंग्रे, व तालुक्याबाहेर कासार्डे कुडाळ या ठिकाणी या बँकेच्या शाखा आहेत २९ जानेवारी २०२३ रोजी देवगड, पडेल, नारिंग्रे, कुडाळ, आणि कासार्डे या पाच केंद्रांवर ही निवडणूक पार पडली आहे…
शिवम पॅनल चे १३ उमेदवार रिंगणात असून सहकार समृद्धी पॅनेलचे १० उमेदवार रिंगणात आहेत. शिवम पॅनेलची निशाणी “कपबशी” व सहकार समृद्धी पॅनेलची निशाणी “मासा” असून रविवारी ती मतपेटीत बंद झाली आहे सोमवारी सकाळी बँकेच्या देवगड येथील प्रधान कार्यालयात मतमोजणी होणार आहे.