श्री चव्हाटेश्वर देवाचा हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श कार्य ; अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री चव्हाटेश्वर मंदीरामध्ये हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श काम या गावातील तरुण पिढीने जोपासले आहे असे गौरवोद्गार शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

श्री चव्हाटेश्वर हुमरमळा (अणाव) येथील भजन स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने अतुल बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलत होते ते पुढे म्हणाले दरवर्षी या मंदिरामध्ये हरीनाम सप्ताह कार्यक्रमाबरोबर बाल भजनी कलाकारांना प्रोत्साहन म्हणून भजनस्पर्धांचे आयोजन केले जाते , या देवस्थानची व्यवस्थापन समिती निस्वार्थी पणे काम करत असुन जिल्ह्यातील आदर्श कमिटी बरोबर सुयोग्य नियोजन आखणी केली जाते हे विशेष असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदीरामधले या देवालयाचे मंदीर अगदीं देखणं आणि सुंदर आहे,या गावाने भजनी परंपरा, संतपरंपरा जोपासत कै.माजी आमदार पुष्पसेन सावंत,कै तात्या पालव , कै. भास्कर पालव, कै.आबा डीगसकर-सावंत, माधु कासले यांच्या सारख्या ज्येष्ठांनी जी यशस्वी वाटचाल केली .
त्याच परंपरेने नविन पिढी नागेंद्र परब, अमरसेन सावंत,जयभारत पालव, पोलिस पाटील उत्तम पालव यांच्या सारख्या व्यक्तीने जुन्या पिढीतील लोकांचा आदर्श घेऊन काम करीत आहेत त्यामुळेच या कार्यक्रमाला दरवर्षी उभारी मिळत आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले. म्हणूनचं भजन स्पर्धेचे कौतुक करत असताना इथल्या तरुण पिढीचे कौतुकही तेवढेच करावेसे वाटते असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे गटनेते माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,अणाव सरपंच लिलाधरअणावकर,संगित विशारद महेश सावंत, भजनी बुवा श्री परब, यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर, ट्रष्टी काका पालव, कुडाळ तालुका शिवसेना सहकार तालुका प्रमुख बाळु पालव, भजनीं बुवा श्री दळवी, देवस्थानचे नाना मांडकर,तबलाविशारद बाबु खडपकर, शिवसेनेचे शिवराम अणावकर उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन माजी उपसभापती जयभारत पालव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!