माजी खा.निलेश राणेंचा हल्लाबोल
मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटीच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार केणी नामक नगरसेवकाचा पेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वारात असलेल्या कोणालाही मी सोडणार नाही यामध्ये आमचे घरी कोणी त्यांनाही सोडणार नाही इारा नितेश राणे यांनी दिला आहे.
आंगणेवाडी भोगलेवाडीच्या माळरानावर उपमुखामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेवेळी भाजप नेते निलेश राणे यांनी धामापूर नळपाणी योजनेच्या निविदेतील भ्रष्टाचाराचा विषय उपस्थित केला आहे, यावेळी ते म्हणाले, धामापूर नळपाणी योजनेचे ४० कोटींचे टेंडर मैनेज होऊन अनेक गोष्टींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत मी कालव मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक स्वतः आहेत. मंदार केणी नावाचा नगरसेवक स्वतः आहे. येत्या आठ दहा दिवसात पत्रकार परिषद घेऊन हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला? हे मी स्पष्ट करणार आहे. यामध्ये कोणालाही मी सोडणार नाही. यामध्ये आमचे कोणी असतील तर त्यांनाही सोडणार नाही. ४० कोटी शहराचे आहेत, लोकांचे आहेत. येणाऱ्या अनेक शेकडो वर्षांसाठी हा निधी आहे -नळपाणी योजना रोज रोज होत नसते, असे असताना लोकप्रतिनिधीच जर आलेल्या पैशावर डाका टाकायला लागले. लुटमार करायला लागले, तर लोकांनी कोणाकडे जाब विचायचा ? हे सगळ षडयंत्र येणाऱ्या आठ दहा दिवसात मी सांगणार आहे. कोणाकडे कशा मीटिंग झाल्या, हे देखील मांडणार आहे. याबाबत काल मुख्याधिकारी जिरगे यांना पत्र पाठवलं आहे, तसा पाठपुरावा मंत्रालयातही असणार आहे. ही निविदा रद्द करून नवीन पारदर्शक निविदा आणावी, जेणेकरून मालवण शहराचा कारभार पारदर्शक चालला आहे. असे लोकांनाही वाटलं पाहिजे, असे सांगून माझ्याकडे जे पुरावे येणार आहेत, ते पत्रकारांसमोर आणणार असल्याच निलेश राणे म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, अशोक सावंत, धोंडू चिंदरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणी भाजपा कार्यकर्त उपस्थित होते.