माझी नागझरवाडी समाज मंदिराचा उद्घांटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कुणकवळे या छोटेखाणी गावातील नागझर वाडीतील ग्रामस्थ मंडळाने समाजिक बांधिलकी जपत लोकसहभागातून तसेच दानशूर व्यक्तीच्या दिलेल्या देणगीतून भव्य अशी ” माझी नागझरवाडी” समाज मंदिराची देखणी वास्तू उभारली असून हि वास्तू म्हणजेच या गावातील समतेचे एकतेचे प्रतिक आहे. या समाजाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे. या माझी नागझरवाडी समाजमंदिरासाठी आपली जमिन विनामुल्य देणाऱ्या बागवे कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे आहे. हा गाव गेली २० वर्षे राणेसाहेबांच्या पाठीशी ठाम उभा आहे. या गावाच्या विकासासाठी आपले सदैव सहकार्य असेल” अशी ग्वाही या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी असलेल्या भाजप नेते तथा जिल्हा बँक सचांलक श्री. बाबा परब यांनी माझी नागझरवाडी मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमावेळी दिली. यावेळी प्रमुख पाहुणे श्री कृष्णा घाडीगावकर, सरपंच मंदार वराडकर, उपसरपंच सुरेश राणे, मंडळाचे अध्यक्ष आनंद(पप्पू)वराडकर, उपाध्यक्ष चद्रकांत पोळ, तरुण उद्योजक प्रितम गावडे, विश्वनाथ मेस्री, सिध्देश पोळ, रामकृष्ण पांचाळ, जयवंत तेली तसेच इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. या माझी नागझरवाडी मंदिराचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कुणकवळे गावचे तरुण सरपंच मंदार वराडकर तसेच उपसरपंच सुरेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश पूजन, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकूंकू कार्यक्रम, सत्कार समारंभ व रात्री डबलबारी भजनाचा कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. या वास्तूसाठी आणि कार्यक्रमासाठी नागझरवाडी मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ पपू वराडकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष योगदान लाभले.













