संत रविदास जयंतीउत्सव नियोजन बैठक माजी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : संत रविदास महाराज जयंती उत्सव नियोजन, जिल्हा समाज ऐक्य जपण्यासाठी जेष्ठ पदाधिकारी, समाजसेवेची आवड असणारे, यापूर्वी आपला बहुमूल्य वेळ समाजासाठी खर्च करणारे जेष्ठ समाज बांधव यांची विशेष सभा विजय चव्हाण (कलमठ) यांचे घरी आयोजित करण्यात आली होती. आपला समाज हा संघटित राहिला पाहिजे, विचारांमध्ये मतभेद असावेत पण समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकाच व्यासपीठावर यावं आणि प्रगती साधता यावी यासाठी विजय चव्हाण यांनी ही सभा आयोजित केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा समाजाच्या वतीने कणकवली येथे करण्यात येणाऱ्या श्री संत रविदास महाराज जयंती बाबत विचार विनिमय करण्यात आला त्यावर जेष्ठ आणि समाजातील अनुभव असणाऱ्या समाज बांधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही जयंती संयुक्तरित्या करणे म्हणजे समाज एकतेचे पाहिले पाऊल आहे.
समाजाचे नेतृत्व जरी आम्ही युवा वर्ग त्यामध्ये पुढे सरून करत असलो तरी आम्ही तुम्हा जेष्ठ समाज बांधवांच्या विचारांचे आम्ही आदर करतो अशी भावना युवा नेतृत्व सुजित जाधव यांनी व्यक्त केली. आपला समाज हा एक राहिला पाहिजे गेली कित्येक वर्षे आपला वेळ समाज हितासाठी व्यतीत केलेल्या समाज बांधवांना विसरून चालणार नाही त्यांनाही आपण आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे आणि हा माझा समाज संघटित राहिला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एक संग राहूया आणि समाजाची प्रगती करूया असे सभेच्या वेळी श्री. विजय चव्हाण बोलत होते त्यावेळी इत्यादी जेष्ठ समाज बांधव उपस्थित होते.नमस्कार, उद्या दिनांक 30 जानेवारी रोजी
संत रविदास महाराज जयंती उत्सव तयारी साठी पुढील नियोजन करता संध्याकाळी 6 वाजता अनिल चव्हाण यांच्या घरी कृती समिती आणि उत्सव समिती मध्ये सहभागी होऊन सहभाग घेऊ इच्छित समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत रविदास जयंती कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.