ब्युरो न्यूज (मुंबई): महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना राष्ट्रीय राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत भाजपा आणि शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या हेतूने ही बैठक होणार होती. जेडीयूचे वरिष्ठ नेते के सी त्यागी यांनी बैठक रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बैठक सध्या रद्द केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच लवकर नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशानानंतर ही बैठक होईल अस सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याचं बोललं जात आहे.महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना राष्ट्रीय राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत भाजपा आणि शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या हेतूने ही बैठक होणार होती.