दिशम परब, साक्षी परब, सीमा चव्हाण, पूर्वी गावडे ठरले सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टारचे विजेते

कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास अकॅडमी कुडाळ आणि आळवे फरसाण स्वीटस् प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार ची फायनल मराठा समाज हॉल कुडाळ येथे पार पडली. डान्स रिॲलिटी शो च्या धर्तीवर झालेली ही स्पर्धा जिल्ह्यातील नवीन नृत्य कलाकरांसा साठी गेले महिनाभर चालू होती आणि ज्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 61 नवीन नृत्य नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा 4 फेऱ्यांमध्ये घेण्यात आली होती.आणि या स्पर्धेच अंतिम राऊंड म्हणजेच फायनल चा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात नुकताच पार पडला. ही नृत्य स्पर्धा एकूण तीन गटामध्ये घेण्यात आली.

संपुर्ण स्पर्धेचे टायटल “सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार” हा सर्वोच्च असा किताब मानकरी अवॉर्ड वेंगुर्ला तुळस येथील कु.दिशम परब याला देण्यात आला.
लहान गट
प्रथम क्रमांक कु.पूर्वी गावडे (गोवेरी)
द्वितीय क्रमांक कु.नयना डागुर (पिंगुळी)
तृतीय क्रमांक कु.स्फुर्ती खांबले (पिंगुळी)
उत्तेजनार्थ क्रमांक
श्रीहरी बालटकर
युतीका सावंत
हर्षदा धर्णे
“मध्यम गट”
प्रथम क्रमांक सीमा चव्हाण (म्हापण)
व्दितीय क्रमांक विरा पारकर(देवगड)
तृतीय क्रमांक दूर्वा चव्हाण(कणकवली
उत्तेजनार्थ क्रमांक
प्राची जाधव
श्रावणी जाधव
हर्षद परब
मोठा गट
प्रथम क्रमांक साक्षी परब(घावनाळे)
द्वितीय क्रमांक विशाखा धामापुरकर(नेरूर)
तृतीय क्रमांक तनिषा नाईक (नेरूर)
उत्तेजनार्थ क्रमांक
यज्ञेश गायकवाड
साक्षी केदार
सानिका राऊळ
आणि सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार स्पर्धेचा सर्वोच्च असा किताब मानकरी अवॉर्ड हा वेंगुर्ला तुळस येथील कु.दिशम परब याला देण्यात आला.
या सर्व विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन आळवे फरसाण स्वीटस् चे सर्वेसर्वा श्री.निलेश आळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आल.सोबत चिमणी पाखरं सल्लागार श्री. सुनिल भोगटे,नागेश नेमळेकर,निलेश जोशी,विलास कुडाळकर (नगरसेवक),उद्योजक प्रसाद रेगे,अमित सामंत, महेंद्र मातोंडकर,सकाळचे पत्रकार अजय सावंत, नामांकित नृत्यांगना मृणाल सावंत,अंकुश कुंभार,उमेश वेंगुर्लेकर,सतीश पावसकर, कु.विठ्ठल तळवलकर,विनोद जाधव,साईप्रसाद सावंत,संजना परब,वेदिका सावंत, कु. संचिता कोलापटे, कु.शेरावती शे,अजित कुडाळकर,रामचंद्र कुडाळकर, कु.दिपाली परूळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे परीक्षण तुळशीदास आर्लेकर,रत्नागिरीचे परीक्षक रोहित पाटील, जिल्ह्यातील नामांकित नृत्यांगना दिक्षा नाईक,आणि चिमणी पाखरचे सर्वेसर्वा रवि कुडाळकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नागेश नेमळेकर,शुभम धुरी आणि निलेश गुरव अश्या जिल्ह्यातील दिग्गज निवेदकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!