ग्रामपंचायतीकडे दिली पावरविडरची भेट…!
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावात चार्यातून सायनाईड विषबाधा होउन 45 जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या दुखाःच्या डोंगरात मदतीचे हात पुढे येत आहेत. काल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने रोख रक्कम देण्यात आली होती. आज संध्याकाळी माजी खासदार डाँ. निलेश राणे यांच्या कडून तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रयत्नातून पावरविडर चिंदर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या मदतीसाठी देण्यात आला. या व्दारे गावातील गुरे दगावलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेती साठी उपयोग होईल असा हेतू आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभारी सरपंच दिपक सुर्वै, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, भाजप नेते मंगेश गावकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, दिगंबर जाधव, सचिन घागरे, राजा पाटणकर, विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, समिर अपराज, बाबा पडवळ आदी उपस्थित होते.