केंद्रीय गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देत केला निषेध व्यक्त
ओराेस (प्रतिनिधी) : मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेली आहे. या घृणास्पद व अमानवीय कृत्याचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिलां सेल सिंधुदुर्गच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. यासंदर्भात देशाच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.
स्त्रियांची अशाप्रकारे धिंड काढून भारतीय संस्कृतीला न शोभणारे कृत्य केल्यामुळे अशा आरोपीना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान असताना एकीकडे मात्र महिलांची विवस्त्र धिंड काढून पुरुषांचा मोठा समूह त्या ठिकाणी अश्लील चाळे करताना दिसून येत आहे. हा प्रकार समस्त मानवजातीसाठी अत्यंत निंदनीय असून, असे कृत्य करणाऱ्या सर्वांना जबर चाप बसला पाहिजे. त्यामुळे महिला सेलच्यावतीने देशाच्या गृहमंत्र्यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले असून त्यांनी हे निवेदन वरिष्ठापर्यंत पाठवण्यात येईल,असे आश्वासन दिले. याप्रसंगी महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा संजना ठाकूर, जिल्हा सरचिटणीस सीमा पंडीत, जिल्हा उपाध्यक्ष समिधा वारंग, किरण मेस्त्री, स्नेहल राजम, वंदना सावंत, मृगनयना सावंत, ऐश्वर्या सावंत आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
ओराेस (प्रतिनिधी) मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेली आहे. या घृणास्पद व अमानवीय कृत्याचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिलां सेल सिंधुदुर्गच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. यासंदर्भात देशाच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.