वैभववाडी -उंबर्डे मार्गालगत सुकलेली व धोकादायक सुरुची झाडे तात्काळ हटवण्याबाबत ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिलेली असताना देखील विभागाने दुर्लक्ष केल्याची ग्रामस्थांची तक्रार

वैभववाडी (प्रतिनिधी ) : वैभववाडी -उंबर्डे रस्त्यावर अनेक सुकलेली व रस्त्याच्या बाजूला झुकलेली झाडे धोकादायक पडण्याच्या स्थितीत आहेत. सदरची झाडे केव्हाही उन्मळून पडतील या स्थितीमध्ये आहेत. मागील 15 दिवसांत अतिवृष्टी व वादळामुळे चार ते पाच झाडे अचानक रस्त्याववर उन्मळून पडलेली आहेत. सुदेवाने कोणतीही हानी झालेली नाही. या झाडांची मुळे खोलवर नसल्याने व सार्वजनिक बांधकाम विभाग गटर खुदाई करताना या झाडांच्या मुळाशी जेसीबी लावत असल्याने सदरची झाडे केव्हाही पडतील अशा स्थितीत आहेत. सदरची धोकादायक झाडे आम्ही अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहेत व सदरची झाडे तोडण्यासाठी गेली वर्षभर लेखी व फोनवरून विनवण्या केलेल्या आहेत. तरी अजूनही सदरची सुरुची धोकादायक सुकलेली व झुकलेली झाडे संबंधीत विभागाने तोडलेली नाहीत. तरी आपण या तालुक्याचे प्रमुख या नात्याने संबंधीत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वैभववाडी या विभागाला सुकलेली व रस्त्यावर झुकलेली सुरुची झाडे ताबडतोब तोडण्याच्या सूचना दयाव्यात या आशयाचे 26 ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार वैभववाडी त्यांचेकडे दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.के.सुतार, सचिन सावंत, किशोर दळवी , राजू पवार, महेश रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!