वन संवर्धन कायदा सुधारणा विधेयकाला विरोध करण्याचे ‘घुंगुरकाठी’चे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वनसंपदा आणि पर्यावरणावर अत्यंत घातक परिणाम करणा-या प्रस्तावित ‘वन संवर्धन कायदा सुधारणा विधेयका’ला कडाडून विरोध करण्याचे आवाहन ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे. आपला विरोध नोंदवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या संख्येने ईमेल पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबतच्या निवेदनात लळीत यांनी म्हटले आहे की, दरडी कोसळतायत… डोंगर खचतायत… कडे कोसळतायत…पुराचा इतिहास नसलेल्या ठिकाणी पूर येतायत..या दरडी, डोंगरकड्यांखाली लाखमोलाची निष्पाप माणसं दबून त्यांचं आणि त्यांच्या वाडीवस्तीचं, गावाचं नामोनिशाण मिटलं जातंय…घाटातले रस्ते खचतायत… जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतोय… जागतिक वारसा स्थळ असलेला पश्चिम घाट (सह्याद्री) क्षणाक्षणाला नष्टप्राय होतोय… पण आपण जागे होत नाही… गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलोत आपण…त्यातच केंद्र सरकारने संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात वन संवर्धन कायद्यात (FCA – Forest Conservation Act- 1980) अत्यंत घातक बदल करणारं वन संवर्धन कायदा दुरुस्ती विधेयक सादर केलंय. हे विधेयक मंजूर झालं तर एकुण वनक्षेत्राच्या १५% क्षेत्र वनेतर (डि-क्लासीफाय) होणार आहे. याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत. आधीच बेसुमार जंगलतोडीमुळे हिरवं आच्छादन झपाटय़ानं कमी होतंय. त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.. हे सर्व बदल पर्यावरण विरोधी असून, यामुळे वनांच्या विनाशाला चालना मिळणार आहे. वनक्षेत्रात विनासायास विकास प्रकल्प सुरू करता यावेत, या हेतूने FCA 1980 या कायद्यात बदल करून या सुधारणा केल्या जात आहेत.

भयंकर आहे हे सगळं…विनाशकारी… स्वतंत्र देशाचे जागरुक नागरिक म्हणून डोळ्यावरची पट्टी काढायची वेळ आता आली आहे. कारण आता नाही, तर कधीच नाही. या वन संवर्धन कायदा (सुधारणा) विधेयकाला सर्व थरातून आणि संपूर्ण देशातून विरोध व्हायला हवाय…तुम्ही आपला विरोध घरबसल्या फक्त एका क्लिकवर नोंदवू शकता..फक्त एकच करा.. https://bit.ly/scrapfca2023 या लिंकवर जाऊन जो मसुदा दिलाय, तो वाचा आणि आवश्यक माहिती भरुन ईमेल पाठवा. त्याची पोच तुम्हाला लगेच तुमच्या ईमेलवर मिळेल. ट्विटरवर असाल तर ट्विटही करा..माझ्या एकट्याच्या मेलने, माझ्या एका मताने काय फरक पडणार? असं म्हणून हात बांधून बसू नका. एका मतानं केंद्रातलं अख्खं सरकार कोसळलं होतं…शुभेच्छा.. त्या देण्याशिवाय दुसरं आणखी काय करु शकतो..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!