अध्यक्ष नार्वेकर यांची गंभीर लक्ष देण्याची मंत्र्यांना सूचना
जे नितेश राणेंना हवे आहे ते करतो ; मंत्र्यांची ग्वाही
मुंबई (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी बाबत ठाणे येथील आयुक्त पावरा यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल चा प्रश्न आज अधिवेशनात मांडला. पावरा यांच्याकडून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या जातपडताळणी चे प्रस्ताव फेटाळून लावले जातात. मात्र न्यायालयाकडे दाद मागीतल्यावर तोच जातपडताळणी प्रस्ताव मंजूर होतो. विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या पावरा नामक अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी मंत्र्यांना याची गंभीर दखल घेण्यास सांगितल्यानंतर मंत्र्यांनी जे नितेश राणेंना हवे आहे ते करतो अशा शब्दांत ग्वाही दिली.











