बांदा (प्रतिनिधी) : बांदा आळवाडा येथील सानिका प्रकाश केसरकर (वय 51) मंगळवारी सकाळी 9.15 वाजता कुडाळ येथे उपचारादरम्यान दिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मंगळवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दिर, भावजया, पुतणे असा परिवार आहे. बांदा आळवाडा येथील गॅस शेगडी दुरूस्ती तथा विक्री करणारे प्रकाश केसरकर यांच्या त्या पत्नी होत.
बांदा आळवाडा येथील सानिका प्रकाश केसरकर यांचे दु:खद निधन












