स्वखर्चाने गावातील जि प शाळांतील विद्यार्थ्यांना केले मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावचे सरपंच विलास नावळे आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद च्या चार शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप करण्यात आले. गावचा प्रथम नागरिक या नात्याने शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविणे ही माझी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा पुरेपूर फायदा घेत अभ्यासात प्रगती करावी.शालेय अभ्यासक्रमासोबत विविध क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षांमध्ये चमक दाखवावी असे आवाहन सरपंच विलास नावळे यांनी केले. गावातील हेळेवाडी, मांजलकरवाडी, मोगरवाडी, भारत विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच रुपेश पाचकूडे, ,विनोद पेडणेकर, नाना रावराणे, अनिल नराम, माजी पं स सदस्या दिव्या पाचकूडे शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.