कणकवली (प्रतिनिधी) : भजनप्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने प. पू. श्री भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे ५ ऑगस्ट रोजी भव्य जिल्हास्तरीय स्पर्धकांची संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भजन प्रेमींना समाजप्रबोधनपर विषयावरील गजर आणि विविध अभंगांचा आस्वाद घेता येणार आहे. संगीत भजन स्पर्धेची पूर्ण तयारी झाली असून, या स्पर्धेसाठी १० निमंत्रित नवोदित भजन मंडळाचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दुपारी २ वा. तर पारितोषिक वितरण सोहळा रात्री १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ७ हजार ७७७ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार ५५५ रु. व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार ३३३ रु. व चषक, उत्तेजनार्थ १ हजार १११ रु. व चषक तसेच उत्कृष्ठ गायक, उत्कृष्ठ तबला, उत्कृष्ठ झांजवादक, उत्कृष्ठ गजर, उत्कृष्ठ पखवाज, उत्कृष्ठ कोरस, उत्कृष्ठ अभंग ५०१ रु. व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी या भजन स्पर्धेचा सर्व भजन रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन भजन प्रेमी व कला संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.