“फोंडाघाट पंचक्रोशीत चुरशीने ७२:३३ % मतदान !

जनशक्ती की धनशक्ती ? एकच चर्चा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये फोंडाघाट पंचक्रोशीतील आठ मतदान केंद्रावर, मविआ आणि महायुती मध्ये चुरशीने- शांततेत मतदान पार पडले.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी धावती भेट देऊन, परिस्थिती पाहणी केली आणि योग्य सूचना केल्या. फोंडाघाट पंचक्रोशीतील आठ मतदान केंद्रावर ७२३० पैकी ५२२९ ( ७२ ) टक्के मतदारांनी, आपला मतदानाचा हक्क बजावला. केंद्र क्रमांक २३९/ २४१/ २४३ या मतदान केंद्रावर सर्वात जास्त मतदान झाले. सकाळी नऊ ते एक आणि संध्याकाळी तीन ते सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

संपूर्ण मतदान प्रक्रिया दोन्ही बाजूने उत्साहात ईर्षेने पार पडली. मतदार घरापासून केंद्रापर्यंत आणण्यात मविआ व युतीचे कार्यकर्ते यांची वाहनासह धावपळ, लक्षणीय होती. हा उत्साह मतदानापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू होता .

पंचक्रोशी मध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही कडील स्थानिक पदाधिकारी- कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. त्यामुळे सजग मतदार, जनशक्ती की धनशक्ती चा विजय होणार ? याची एकच चर्चा पंचक्रोशीत घोळक्या -घोळक्याने करत आहे. यावेळी दोन्ही उमेदवार अथवा मविआ – युतीचे जिल्हा नेते यांची धावती भेट सुद्धा फोंडाघाट सारख्या संवेदनशील केंद्रावर झाली नाही ? याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. मुंबई- ठाणे इत्यादी ठिकाणाहून मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदारांनी येऊन आपला हक्क बजावला. त्यामुळे चाकरमान्यांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. आता सर्वांना २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या कणकवली- वैभववाडी- देवगड मतदार संघासह जिल्ह्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!