खासदार राऊत आणि आपल्या आमदार भावाला टोलनाक्याचे कंत्राट न मिळाल्याने सुशांत नाईक वैफल्यग्रस्त – शिशिर परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उद्धव ठाकरें सारखे सेटलमेंट वाले नेते नाहीत.आमदार नितेश राणे हे वैभववाडीतील रस्त्याच्या प्रश्नी गडकरींना भेटले हे उघड आहे. पण ते आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री यांना भेटतात तसे गपचूप पायघड्या घालत भेटले नाहीत. तसेच अजून आमदारकीची स्वप्ने पाहू नका, आमदार नितेश राणेंच्या आसपास देखील तुम्ही येणार नाही असा टोला माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला आहे. चोरुन गाठीभेटी घेणे, गोपनीय युती करणे, व्यवसायासाठी राजकारण करणे, राजकारणातून व्यवसाय उभारणे याची सवय नाईक यांना आहे. राजकारणातून व्यवसाय आणि व्यवसायातून राजकारण हे ध्येय बाळगलेल्या नाईक कुटुंबीयांना आपली विचारधारा ही फयद्याशी संबंधित ठेवली त्यामुळे आमदार वैभव नाईक हे कधी उडी मारतील ते सुशांत नाईक यांना समजणार देखील नाही. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे त्यांच्या कंपनीला टोल मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. पण ते जमले नाही म्हणून आता सुशात नाईक यांचा जळफळाट असल्याचा टोला श्री परुळेकर यांनी लगावला.

error: Content is protected !!