देवगड (प्रतिनिधी) : भाजपा चे युवा नेते आमदार नितेश राणेंवर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्यत्तर देताना कहा राजा भोज… या प्रचलित म्हणीचा वापर करताना तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा यत्किंचितही हेतू नव्हता. आमदार नितेश राणेंवर टीका करण्याएवढी अतुल रावराणेंची पात्रता नाही हेच फक्त त्यातून व्यक्त करायचे होते. त्यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता हे नमूद करत असतानाच तेली बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करत असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.