पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास योजनेचा शुभारंभ
ब्युरो न्युज (मुंबई) : पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास योजनेचा शुभारंभ झाला. याच कार्यक्रमामध्ये मोदींनी हा टोला लगावला. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत पंतप्रधानांनी देशातील वेगवेगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुर्निकासाच्या कामांचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत अनेक रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा पालटणार आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वे स्थानकांचा हा सर्वात मोठा मेक ओव्हर असेल असं सांगण्यात आलं आहे. यामध्ये 27 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वे स्थानके कात टाकणार आहेत. या रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तब्बल 24 हजार 470 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कोणत्या राज्यांतील किती स्टेशन्सचा समावेश
24470 कोटींच्या या योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येक 55 स्थानकांचा समावेश आहे. बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशमधील 34, आसाममधील 32, ओडिशामधील 25, पंजाबमधील 22, गुजरात आणि तेलंगणमधील प्रत्येकी 21 स्थानकांचा समावेश आहे. झारंखडंमधील 20, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील प्रत्येकी 18, हरियाणामधील 15 आणि कर्नाटकमधील 13 स्टेशनचा समावेश आहे.