खलाशाचा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

देवगड बंदरातील घटना

देवगड (प्रतिनिधी) : तंबाखू घेऊन येतो असे सांगून गेलेल्या देवगड बंदरातील शिवप्रसाद या नौके वरील खलाशी रामाप्पा रायाप्पा कुंभार याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत म्हापसेकर यांच्या बागेत आढळून आला आहे ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.

देवगड बंदरातील पाटील यांच्या मालकीच्या शिवप्रसाद या नौकेवर रामाप्पा कुंभार हा खल्लाशी म्हणून कामाला होता या नौकेवरील चार खलाशी गावी गेल्यामुळे गेले आठ दिवस ही नौका बंद होती.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता रामाप्पा याने नोकरीचे तांडेल राजभक्षी यलगार यांना मी बाजारातून तंबाखू घेऊन येतो असे सांगितले त्यानंतर दुपारी ते नौकेवर जेवणासाठी आले नाहीत त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू केली असता जवळच असलेल्या म्हापसेकर बागेत आंब्याच्या कलंबाला गळफास लावलेले असते ती त्यांचा मृतदेह सापडून आला.

याबाबतची खबर माहिती तांडेल राज्यभक्षी यलगार यांनी प्रथम नौका मालक पाटील यांना दिली यानंतर देवगड पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.

error: Content is protected !!