विजयदुर्ग ग्रामपंचायती वतीने किल्ले विजयदुर्ग येथे विश्व हेलियमडे चे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : 800 वर्षाहून जास्त ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला किल्ला म्हणून ज्याची ख्याती आहे तोच किल्ला म्हणजे आपला विजयदुर्ग किल्ला होय ह्याच किल्ल्याची अजून एक ओळख म्हणजे हेलियम वायूचे पाळणा घर म्हणूनही जगप्रसिद्ध असणारा आपला किल्ले विजयदुर्ग येथे शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी विश्व हेलियम दिवस ( हेलियम वायूचा 155 वा वाढदिवस ) साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 09:30 वा – एसटी डेपो विजयदुर्ग ते किल्ले विजयदुर्ग – ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक, सकाळी 10:00 वाजता – किल्ले विजयदुर्ग येथे मान्यवर स्वागत, शिलाफलक व साहेबाचे ओटे यांचा पुष्पहार अर्पण, सकाळी 10:30 वा – हेलियम वायूचा इतिहास – डॉ आठवले यांचे मार्गदर्शन व प्रोजेक्टरद्वारे माहिती प्रसारण व विविध कार्यक्रम, दुपारी 12:00 वाजता – कार्यक्रम सांगता व अल्पोपहार वाटप असे कार्यक्रमाचे स्वरुप असणार आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत विजयदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!