मसुरे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने व भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या शिफारशीनुसार व पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशान शेडचे लोकार्पण नाभिक समाजाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सुभाष लाड,ग्रामपंचायत सदस्य शरद मांजरेकर,मेघा गावडे, बूथ प्रमुख भाई चिरमुले,आदर्श गाव सस्था प्रमुख मंगेश सावंत, नंदू नाईक,रमेश परब,संतोष चव्हाण,संदेश पवार,तसेच वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.














