कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सिंधुदुर्ग संपर्कमंत्री पदी मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सिंधुदुर्गसह अहमदनगर जिल्ह्याचीही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोपविली आहे. पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रत्येक मंत्र्यावर जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग चे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ हे लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.
मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री












