काळसे श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज


चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवार दिनांक ५ फेब्रूवारी रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त देवीची विधीवत पूजा , देवीचे दर्शन आणि ओट्या भरणे, गाऱ्हाणी घालणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्रौ खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. याचाही भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!