सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान 2023 पुरस्कार प्रदान..

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारींग्रे गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण रत्न सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सीने अभिनेते आणि सिंधू रत्न कलावंत मंचचे अध्यक्ष विजय पाटकर, सिंधू रत्न कलावंत मंच उपाध्यक्ष अलका कुबल, आदरणीय अजित फनसेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मनोहर शकुंतला नरे गुरु मिठबावकर प्रदीप ढवळ प्रवीण आमरे सचिन नारकर हरि पाटणकर आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कोकणातही यशस्वी उद्योजक होऊ शकतात व स्वतःबरोबर इतर कुटुंबांना देखील ते रोजगार मिळवून देऊ शकतात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच उद्योजक नवीन चंद्र बंदीवडेकर हे आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उद्योग क्षेत्र निवडले. मेहनत व चिकाटीच्या जोरावर उद्योग यशस्वी देखील करून दाखविला. आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नवीन कलाकारांना विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे तसेच विविध सांस्कृतिक शिबिरे भरविण्यात नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा मोठा वाटा आहे. तसेच अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्षपदाची धुरा ते अनेक वर्ष सांभाळत असून भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी मोठे योगदान देशभरात दिलेले आहे. भंडारी समाजाला सर्व क्षेत्रात न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा कोकण रत्न सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले आजपर्यंत मी उद्योग क्षेत्रा साठी तसेच भंडारी समाजासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. उद्योग क्षेत्रात कोकणातील अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच भंडारी समाजाच्या उन्नतीसाठी यापुढेही मी तन-मन-धन अर्पण करून काम करेन. सिंदूरत्न कलावंत मंच ही संस्था अतिशय दिशादर्शक असे कार्य करत असून या संस्थेच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. आजचा हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मला नेहमी सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्या परिवाराचा आहे. यावेळी प्रसिद्ध सीने अभिनेते विजय पाटकर यांनी नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!