100 सुवासिनी नऊवारी साडी परिधान करून करणार नामदार राणेंचे औक्षण
नामदार राणेंच्या स्वागताचा 30 फुटी हटके कट आउट ठरतोय लक्षवेधी
देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेले नामदार नितेश राणे उद्या 22 डिसेंबर रोजी प्रथमच पडेल मंडल मध्ये येत आहेत. यानिमित्ताने भाजपा पडेल मंडल च्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी सांगितले. पडेल मंडल भाजपा कार्यालसमोर नामदार नीतेश राणेंचे शाही स्वागत करण्यात येणार आहे.पडेल कॅन्टीन येथे ढोल ताशांच्या गजरात नऊ वारी परिधान केलेल्या 100 सुवासिनी पारंपरिक वेशभूषेत मंत्री नितेश राणे यांचे औक्षण करणार आहेत.नामदार नीतेश राणेंच्या स्वागतासाठी पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर यांनी उभारलेले 30 फूट उंचीचे कट आउट अत्यंत लक्षवेधी ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीत 58 हजारांच्या लिडने आमदार नितेश राणेंनी विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आमदार नितेश राणेंना कणकवली देवगड वैभववाडी या तिन्ही तालुक्यातून देवगड तालुक्याने सर्वाधिक मताधिक्य दिले होते. देवगड तालुक्यातून सर्वाधिक मतदान पडेल जिल्हा परिषद मतदारसंघ विभागातून नीतेश राणेंना मिळाले. त्यामुळे सिंधुदुर्गात आल्यानन्तर प्रथम पडेल मंडल मध्ये मंत्री नीतेश राणे पहिली भेट देणार आहेत. पडेल कॅन्टीन येथे संपन्न होणाऱ्या शाही स्वागत सोहळ्याचे नियोजन भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, पडेल मंडल प्रभारी डॉ अमोल तेली, माजी जी प उपाध्यक्ष आरिफ बगदादी, माजी सभापती रवी पाळेकर, पडेल मंडल भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, तालुका सरचिटणीस रवी तिर्लोटकर, उपाध्यक्ष अजित राणे, मकरंद जोशी, रामकृष्ण जुवाटकर, संजय बोंबडी, पडेल सरपंच भूषण पोकळे,माजी जि प सदस्य गणेश राणे करत आहेत. मंत्री नितेश राणेंच्या या शाही स्वागत सोहळ्यासाठी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी केले आहे.












