श्रीमती नलिनी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील मुणगे सावंतवाडी येथील श्रीमती नलिनी मारुती बागवे (९५ वर्ष) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील आंबा बागायतदार अशोक आणि लवू बागवे यांच्या मातोश्री तर बांधकाम व्यावसाईक नाना बागवे यांच्या काकी आणि श्री भगवती हायस्कुलचे सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे यांच्या चुलत आजी होत.

error: Content is protected !!