पाकिस्तानचे गोडवे गायचेत तर पाकिस्तानात जा

त्या युवतीवर कडक कारवाई करा – रज्जाक बटवाले

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे मिळून एकत्र वागत आहेत हिन्दु – मुस्लिम एकतेचे अनेक उदाहरणे आहेत तेव्हा ज्यांनी हि अशी घटना केली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांचा वर कडक कारवाई करावी व अश्या घटना पुन्हा घडू नये व समाजात जे कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा वर कडक कारवाई करावी व कणकवली तालुक्यात सर्वधर्मसमभाव सलोख्याचे वातावरण चांगले आहे व सर्व एकत्र मिळून अनेक सण उत्साहात साजरा करतात असे अनेक उदाहरणे आहेत.

पाकिस्तान हा देश आमचा शत्रू आहे जर कुणाला पाकिस्तान चे गोडवे गायचे आहे व त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल त्यांनी आपलं सर्व काही ते उचलायच व आपलं नाव आमच्या देशातून काढून तिथेच कायमचं राहायला जायच आशा लोकांनी येथे राहू नये. आशा लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतो तेव्हा पोलिस खात्याने ताबडतोब चोकोशी करून संबंधित व्यक्ती वर कडक कारवाई करावी असे नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत.

error: Content is protected !!