स्थानिक व्यापारी महासेल चा खचाखच गर्दीने प्रतिसा
कणकवली (प्रतिनिधी) : खरेदीसाठी ग्राहकांची ओव्हरफ्लो गर्दी म्हणजे काय असते, हे बघायचे असेल तर एक वेळ कणकवली कापड व्यापारी आयोजित महासेल ला अवश्य भेट द्यायलाच हवी. कोल्हापूर गांधीनगर पेक्षा स्वस्त पण दर्जेदार साड्या , ब्लॅंकेट आणि हँडलूम सह अन्य वस्तू खरेदीसाठी उदघाटनाच्या दिवशी सांयकाळी ग्राहकांनी अक्षरशः ओव्हरफ्लो गर्दी केली होती. खचाखच गर्दी ने हॉल भरल्यानंतर नाईलाजाने काही ग्राहकांना हॉलच्या बाहेर आपला नंबर येईपर्यंत वाट बघत रांगेत थांबावे लागले.उदघाटनादिवशीच सायंकाळपर्यंत अडीच हजारहून अधिक ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या महासेलला भेट देत मनमुराद खरेदी केली.














