गणेशोत्सवापूर्वी रेल्वे स्टेशन आवारातील खड्डे बुजवा

अन्यथा खड्ड्यांत करणार वृक्षारोपण

शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोकेंचा इशारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्थानक आवारातील मुख्य गेटजवळ मोठाले खड्डे पडले असून वाहनचालक, रिक्षाचालकाना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.गणेशोत्सव तोंडावर असून गणेशोत्सव पूर्वी हे खड्डे भरून डागडुजी करा अन्यथा रिक्षाचालकांसह प्रवाशांना सोबत घेऊन त्या खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी कोकण रेल्वे च्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. वैभववाडी रेल्वे स्टेशनवरून वैभववाडी तालुक्यासह लगतच्या तळेरे, नांदगाव, खारेपाटण, पंचक्रोशी सह देवगड आणि गगनबावडा तालुक्यातील प्रवासी हजारोंच्या संख्येने दररोज प्रवास करतात. गणेशोत्सव काळात ही प्रवासी संख्या दस पट वाढलेली असते. रेल्वे स्टेशन च्या मुख्य गेटवर पडलेले मोठाले खड्डे तसेच खड्डेमय परिसरामुळे प्रवाशांना रिक्षात बसताना आणि प्रवास करतानाही त्रास होतो. आगामी गणेश चतुर्थी पूर्वी हे खड्डे भरून डागडुजी करा अन्यथा त्या खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा लोके यांनी दिला आहे.

error: Content is protected !!