कणकवली (प्रतिनिधी) : चेतन फुटबॉल क्लब चा खेळाडू आणि के.ए.बांठीया न्यू स्कुल पनवेल इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आर्यक (प्रिन्स )नरेंद्रकुमार जाधव याची 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2023 या कालावधीत प. बंगाल येथे होणाऱ्या 14 वर्षांखालील सब ज्युनिअर च नॅशनल चॅम्पियनशिप संघात 2023-24 साठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात निवड झालेली आहे.
आर्यक हा मूळ कणकवली तालुक्यातील कलमठ सिद्धार्थ काॅलनी येथील रहिवाशी असून बालपणापासून तो पनवेल के.ए.बांठिया इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.आर्यक याला फूटबॉल खेळाची आवड आहे.आर्यक हा फुटबॉल बरोबरच रायगड जिल्ह्यातून 14 वर्षाखालील लेदरबाॅल क्रिकेट टीम मधून खेळतो.
त्याच्या या यशाबद्दल आर्यक याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आर्यक चे वडील नरेंद्र कुमार जाधव हे तळोजा पनवेल येथे केमिकल कंपनीत सुपरवायझर असून,आई निकिता जाधव खासगी शाळेत शिक्षिका आहे.तसेच निवृत्त तालूका मास्तर के.स.जाधव यांचा आर्यक हा नातू आहे.











