अटकसत्र सुरू

कनेडी राड्यात पोलिसांनी 10 आरोपीना मध्यरात्री केली अटक

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसनेच्या कनेडी येथील राड्यात आयपीसी 307 मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण 6 तर आयपीसी 353 मधील 4 आरोपींना कणकवली पोलिसांनी आज मध्यरात्री अडीच वाजता अटक केली आहे. यामध्ये आयपीसी 307 मधील गुन्ह्यात दोन्ही गटातील कुणाल सावंत, योगेश वाळके, मंगेश सावंत, श्रीकांत सावंत, राजेश पवार, निखिल आचरेकर या 6 जणांना तर आयपीसी 353 मधील अनिल पांगम, संतोष आग्रे, संदीप गावकर, तुषार गावकर याना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सागर खंडागळे, पीएसआय वृषाली बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली

error: Content is protected !!