चिकन,मच्छी,मटण घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
खारेपाटण (प्रतिनिधी) : गौरी – गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण मासळी मार्केट मध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती.तर मच्छी,चिकन,मटण घेण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली होती. श्रावण मास संपल्यानंतर गणेश चतुर्थी सणात आज गौरी आल्यानंतर ग्राहकानी मांसाहार खरेदी करण्यासाठी खारेपाटण मासळी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अक्षरशः चिकन मटण घेण्यासाठी सर्वच दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. खारेपाटणसह आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गावच्या नागरिकांना मासे चिकन व मटण घेण्यासाठी खारेपाटण मासळी मार्केट हे सोयीचे ठिकाण ठरत असून ग्राहकानी सकाळ पासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती.
मुंबईवरून गावात दाखल झालेले चाकरमानी तथा गणेश भक्त हे आपली खाजगी वाहने घेऊन खारेपाटण शहरात दाखल झाल्यामुळे काही काळ रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.मात्र खारेपाटण पोलिस दुरर्षेत्राचे पोलीस कर्मचारी श्री उद्धव साबळे, पराग मोहिते, यांच्या योग्य नियोजनामुळे व ट्रॅफिक पोलिस प्रशांत धुमाळे,होमगार्ड गोपाळ लोके यांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.