प्रतिनिधी ( आनंद तांबे ): नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुननबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी ८ वाजता नांदगाव तिठा व खालची मुस्लिम बांधव गोसिया मस्जिद येथून आपल्या मोहलयातून रॅली काढली व या रॅलीत त्यांनी ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक, नारे तकबिर आलोहो अकबर,नारे रिसालत या रसुलुला अश्या घोषणा दिल्या या वेळी प्रत्येक मोहलयातून घराघरात मिठाई शिरखुरमा सामोसे, लाडू, सरबत पाणी आदी वस्तू ईद मुबारक निमित्ताने वाटण्यात आले या रॅलीत सर्व मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील कासार्डे पोलीस दुरक्षेत्र पोलीस झोरे, वाहतूक पोलीस आबिटकर, पोलिस शिंदे , आदी उपस्थित होते. ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील व वाहतूक पोलीस आबिटकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी मनोज पाटील यांनी ईद मुबारक निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मुस्लिम -हिंदू बांधवांना नियाज वाटण्यात आला.