परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये लुटणाऱ्या मंगेश बागवे ला न्यायालयीन कोठडी

पुण्यातील सह आरोपी महेश रजपुतला बजावलं पकड वॉरंट

ओरोस (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हरकुळ कांबळेवाडी येथील सदानंद नामदेव तीवरेकर यांच्या मुलाला परदेशात नोकरीला लावतो म्हणून घेतलेले एक लाख दहा रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी मंगेश राघोजी बागवे रा. मसुरे ता. मालवण यांना न्यायालयातील कोठडी सुनावली आहे. तर त्यांचे साथीदार महेश आदिनाथ रजपूत रा. पुणे यास पकड वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादी सदानंद नामदेव तीवरेकर यांच्या घरी एप्रिल 2011 मध्ये यातील संशयित आरोपी शिवाजी रघुनाथ पवार हे आपले मित्र आरोपी मंगेश राघोजी बागवे, रा. मसुरे ता. मालवण व महेश आदिनाथ रजपूत रा. पुणे यांना घेवून येत आम्ही सुशिक्षित मुलांना नोकरीस लावतो. आम्ही बरेच मुलांना मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी तसेच भारताच्या बाहेर परदेशातही नोकरी लावलेले आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा सदानंद तीवरेकर हा एफ वाय बी कॉम मध्ये शिक्षण घेत असल्याने आपण परदेशात नोकरी मिळाल्यास जाण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार आरोपी यांनी तुमच्या मुलाला कॅनडा येथे हाऊसकीपिंगची काम लावतो. त्याकरता एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेचे कर्ज काढून आरोपी मंगेश राघोजी बागवे, रा. मसूरे ता. मालवण शिवाजी रघुनाथ पवार, महेश आदिनाथ रजपूत, रा. पुणे यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपये दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी यांचा मुलगा सदानंद तसेच वीरेंद्र सुरेश चव्हाण, योगेश अभिष्ट, आदेश चंद्रकांत कुऱ्हाडे, चेतन रामचंद्र परब वगैरे लोकांकडून याप्रमाणेच आरोपींनी पैसे घेतलेले होते. त्यांनाही नोकरी लावतो असे सांगितले होते. परंतु आता त्यांना नोकरीस लावणे टाळाटाळ करू लागल्याने फिर्यादी यांनी 24 सप्टेंबर 2013 रोजी आरोपी विरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे. अद्याप पर्यंत आरोपी मंगेश राघोजी बागवे व शिवाजी रघुनाथ पवार व महेश रजपूत यांच्याकडे दिलेल्या तारखेला रक्कम परत करतो असे सांगतात परंतु त्यांनी पैसे देण्यास अद्याप पर्यंत टाळाटाळ केलेली आहे टाळाटाळ केलेली आहे. आज 29 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही रक्कम देतो, असे आरोपी मंगेश राघोजी बागवे याने सांगितले होते. परंतु आजही त्यांनी रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी मंगेश राघोजी बागवे रा. मसुरे तालुका मालवण यांना जिल्हा कारागृह वर्ग दोन सावंतवाडी येथे त्यांची रवानगी केलेली आहे. तसेच महेश आदिनाथ रजपूत रा. पुणे यास पकड वॉरंट काढण्याचे आदेश केलेले आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!