मामा वरेरकर नाट्यगृहात साधणार संवाद
कणकवली (प्रतिनिधी): मनसे च्या माध्यमातून निसर्गोपचार तज्ञ महाराष्ट्र पुरस्कार विजेते स्वागत तोडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आणि रोगनिदान प्रात्यक्षिक आयोजित केले आहे. मानवी जीवनातील सर्व आजारांवर घरगुती उपचार, निसर्गोपचार बाबत या व्याख्यानात मार्गदर्शन मिळणार आहे.जनतेच्या, रुग्णांना आपल्या व्याधींबाबत समस्या थेट तोडकर यांच्याकडे मांडण्याची आणि त्यावर सहजसुलभ घरगुती , निसर्गोपचार काय आहेत याची माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.