आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बारापाच मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात दुखः व्यक्त केले जात आहे.