गौतमी पाटील चा लाईव्ह डान्स पाहण्याची सिंधुदुर्गवासीयांना सुवर्णसंधी
भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळें ची कॉमेडी सुपरफास्ट हसवून करणार लोटपोट
कणकवली (प्रतिनिधी): अवघ्या तरुणाईला भुरळ पाडलेल्या सुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ मधील डी जे डान्स शो ला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून सबसे कातील …गौतमी पाटील चा तब्बल 3 तास भन्नाट लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची सुवर्णसंधी सिंधुदुर्गवासीयांना कुडाळ आणि कणकवली मध्ये 8 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. तसेच झी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे, कॉमेडी स्टार भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, स्नेहल शिडम, रोहित चव्हाण यांचा सुपरफास्ट कॉमेडीचा तडका लाईव्ह परफॉर्मन्स 7 ऑक्टोबर रोजी कणकवली आणि कुडाळ मध्ये सादर होणार आहे. देवगड ऍम्युजमेंट चे संचालक धैर्यशील पाटील, ड्रीम इव्हेंट्स चे गौरव मुंज, योगेश ताम्हाणेकर, चानी जाधव, परेश कांबळी यांनी कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. वेस्टर्न आणि इंडियन फ्युजन च्या आपल्या अनोख्या नृत्यशैलीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपले फॅन निर्माण केलेल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील च्या डान्स लाईव्ह पाहण्याची नामी संधी रविवार 8 ऑक्टोबर 2023 रोजी सिंधुदुर्गवासीयांना चालून आली आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ मध्ये मराठा मंडळ सभागृहात गौतमी पाटील चा लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात गौतमी पाटील लाईव्ह परफार्मन्स सादर करणार आहे. गौतमी पाटीलसह 8 नृत्य सहकलाकार या डीजे डान्स शो मध्ये आपला डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. 7 ऑक्टोबर रोजीच्या कॉमेडी सुपरफास्ट आणि 8 ऑक्टोबर रोजीच्या सुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील च्या लाईव्ह प्रत्येक शो साठी प्रेक्षक गॅलरीतील पहिल्या 5 रांगेसाठी दीड हजार आणि त्यापुढील रांगेसाठी 1 हजार तिकीट दर आहे. कुडाळ आणि कणकवली येथे बंदिस्त सभागृहात सादर होणाऱ्या या दोन्ही कार्यक्रमासाठी सुरक्षा आणि आरोग्यविषयक दक्षता घेण्यात आली असल्याचेही आयोजकांकडून सांगण्यात आले.